मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले . या अधिवेशनात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींवर केलेल्या अभद्र टिप्पणीचा मुद्दा गाजला. मात्र फडणवीसांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच आम्ही निवडणुकीला केंव्हाही तयार आहोत असे फडणवीसांनी सांगितले
Similar Posts
शालिनी सहकारी बँक लिमिटेड 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
शालिनी सहकारी बँक लिमिटेड 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब सदाशिव देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच वसंतदादा इंजीनियरिंग कॉलेज येथे संपन्न झाली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष आप्पासाहेब देसाई यांनी बँकेची गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मोबाईल नेट बँकिंग सेवेच्या मागणीची पूर्तता करून त्याद्वारे व्यवहार करण्याचे आव्हान केले. तसेच बँकेचे क्षेत्र पश्चिम…
सौदी मधून ५० हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांची हकालपट्टी
दुबई/संपूर्ण जगात पाकिस्तानची बदनामी झालेली आहे. आता सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती पाकिस्तानी नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या दोन्ही देशांनी आपल्या देशातून ५० हजार पेक्षा जास्त पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावले आहे. यामुळे पाकिस्तानची जगात किंमत काय आहे हे समोर आले आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यावर बोलताना म्हटले की, ‘ही प्रवृत्ती पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब…
मुंबईत गृहनिर्माण सहकारी संस्थांची-१३ व १४ मे रोजी भव्य परिषद होणार
मुंबई- मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुंबईत पहिल्यांदाच भव्य अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १३ मे आणि रविवार १४ मे रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर ही परिषद संपन्न होणार आहे, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण…
मुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पत्रकार श्री.पंढरीनाथ सावंत यांना केला सुपूर्द
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटचे सहकारी राहिलेले आहेत, तसेच शिवसेनेचा आवाज बुलंद करणाऱ्या – मार्मिक च्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, प्रकृतीस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना बसविण्यात आलेल्या पेस मेकरची बॅटरी बदलायची आहे. त्याकरिता मोठा खर्च अपेक्षित आहे, असे लक्षात आले. त्यांचे कार्य आणि शिवसेनेसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन…
मुंबईतील हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले – बी डी डी चाळीतील ५५६ रहिवाशांना घराच्या चाव्या वाटप
मुंबई/ मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळ वासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र…
पालिका शाळेतील विध्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालोपयोगी वस्तू
मुंबई – महानगरापालिकेच्या शाळा गुरुवार, १५ जूनपासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालोपयोगी वस्तू सुमारे ९० टक्के शाळांमध्ये पोहोचल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी निम्मे शैक्षणिक वर्ष सरल्यानंतरही विद्यार्थ्यांना वस्तू मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले होते.मुबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या…
