मुंबई/ अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार मूर्जि पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तसेच इतर अपक्ष उमेदवारही माघार घेण्याचा तयारीत आहेत त्यामुळे श्रीमती लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंधेरी पोटनिवडणूक अटीतटीची होणार असे वाटले होते कारण भाजपने त्यांचा उमेदवार उभा केला होता पण शरद पवार यांनी भाजपला उमेदवार मागे घेण्याचे आव्हान केले होते तसेच राज ठाकरे यांनीही उप मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून तुमचा मागे घेण्याचे आवाहन केले होते . त्यानुसार सोमवारी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला तसेच अपक्षणीही उमेदवारी अर्ज मागे घेतले .त्यामुळे आता ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होणार आहे .
