सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना तोंड देत रोजच्या गरजा भागवताना पैशाची भासणारी चणचण ! या सर्वातून वाटचाल करताना माणसाची चांगलीच दमछाक होते आहे .आणि असे असतानाही माणूस जगण्यासाठी रोजच्या रोज परिस्थितीशी संघर्ष करीत आहे .आणि हे सर्व प्रत्येक वर्षी तो अनुभवत असल्याने आता ही सगळी संकटे त्याच्या रोजच्या जिवणाचाच एक भाग बनली आहेत. या संकटाचा माणूस कसाही सामना करू शकतो पण समोर आणखी एक भयानक संकट उभे आहे आणि ते म्हणजे कोरोणाचे संकट! कोरोणाची तीव्रता किती भयंकर असते ते माणसाने 2020 पासून तब्बल दीड वर्ष अनुभवली भारतात जवळपास दीड कोटी लोकांना करोन झाला होता त्यातील साडेचार लाख लोकांचा मृत्यू झाला .ज्यांचा कोरोनातून मृत्यू झाला ते सुटले पण त्यांच्या कुटुंबाचे जे हाल, झाले त्याच्या आठवणीने सुधा अंगावर काटा येतो, कोरोनाच्या वेळी झालेल्या लोकडाऊन मुळे उद्योग धंदे बंद पडले कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली . पैसा अभावी मुलाबाळांचे शिक्षण बुडाले.जे लोक भाड्याने राहत होते त्यांना घरभाडे थकल्याने बेघर व्हावे लागले त्यातच कोरोना काळात उपचाराच्या नावाखाली काही ठिकाणी डॉक्टर लोकांना लुबडत होते त्यामुळे जगणे मुश्किल झाले होत 2021 चां शेवटच्या टप्प्यात लसीकरण सुरू झालं आणि हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसे सरकारने कोरोना काळात लावलेले निर्बंध उठवले आणि 2022 पासून जनजीवन पूर्वपदावर आले. करोनातून जे वाचले त्यांच्यासाठी उर्वरित आयुष्य हा एक प्रकारे बोनस च म्हणावा लागेल आणि म्हणूनच वर्षभराने पुन्हा करोना परतल्याने जगातील प्रत्येक माणूस भयभीत आहे.पुन्हा 2020 सारखी परिस्थिती येऊ नये यासाठी माणूस ईश्वराकडे प्रार्थना करतोय
Similar Posts
तर तुला चपलेने मारू!लालूच्या मुलीने राजकारण आणि कुटुंबाची साथ सोडली
..पाटणा/ बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता लालूंच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणी यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली…
आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न -निर्णयावर गुन्हा दाखल
आळंदी – संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी अमिश दाखवून धर्मांतर करायला लावणाऱ्या ख्रिश्चन इसम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा…
अपात्र ठरली सुवर्णपदक गमावले – पण १४० कोटी भारतीयांचे मन विनेशनी जिंकले
पॅरिस – तीन पहिलवानांना चितपट करून फायनल मध्ये पोचलेली भारताची स्टार कुस्तीगीर विनेश फोगट हिचे अंतिम फेरीत वजन वाढल्याने तिला अपात्र पॅरिस ऑलिम्पिकच्या १२व्या दिवशी भारताला सर्वात मोठा धक्का बसला. भारताची सुवर्णपदकाची दावेदार असणाऱ्या विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरवण्यात आले आहे. यासह भारताचे अजून एक पदक हुकले.दरम्यान आज लोकसभा अधिवेशनातही…
अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची दैना
कोल्हापूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हरभरा, ज्वारी,कापूस , ऊस, या पिकांच्या बरोबरच आंबा आणि इतर फळांचे तसेच पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी…
पत्रकार दिनाबाबत-बाळ शास्त्री जांभेकर यांना कोटी कोटी प्रणाम
६ जानेवारी २०२२ पत्रकार दिन बाळ शास्त्री जांभेकर यांचा आज जन्म दिवस मुंबईतील इलीकस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना समाजात वावरत असताना शास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश याबरोबरच अनेक रूढी चाली रीती अज्ञान दारिद्रय भाकड समजुती यामुळे समाज कसा व्याधीग्रस्त झालाय या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवलं की केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही.तर…
बाबा सिद्दिकी हत्तेतील फरार आरोपीला कॅनडात अटक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणातील फरार असलेल्या आरोपी झिशान अख्तर संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी झिशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल याला कॅनडातील सरे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातला फरार असलेला मुख्य आरोपी झिशान अख्तर कॅनडात सापडल्याची माहिती. सूत्रांच्या माहितीनुसार झिशान…
