मुंबई/ रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलीस यांच्या मुजोरी मुळे प्रवासी खूप, हैराण, ,झाले आहेत . कारण दादर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाच्या नजदीक,असलेल्या टॅक्सी स्टँड वर जवळची म्हणजेच परेल,नायगाव भोईवाडा येथील भाडी टॅक्सीवाले घेत नाहीत वास्तविक भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी जवळचे भाडे घेतले जात नाही बरे वाहतूक पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यास ते तक्रार घेत नाहीत . उलट प्रवाशनाच दमदाटी करतात शनिवारी रात्री 10.30 वाजता पत्रकार सोनू जाधव यांनी स्टँड वरच्या एका टॅक्सी चालकाला टी बी हॉस्पिटल जाणा है असे सांगितले पण जवळचे भाडे असल्याने टॅक्सी वाल्याने नकार दिला त्यामुळे जाधव यांनी ट्रॅफिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला .पण त्याच वेळी त्या ठिकाणी दुसरा ट्रॅफिक पोलिस आला आणि त्याने जाधव याना दमदाटी करीत धमकी दिली मारण्यासाठी अंगावर धावला . अखेर जाधव याना चालत घरी जावे लागले जाधव यांनी सदर प्रकरणी वाहतूक मांटुगा पोलीस निरीक्षक हरिदास तसेच वाहतूक पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे .
Similar Posts
ट्रम्प यांच्यावरील गोळीबारा नंतर भारतातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ
नवी दिल्ली/अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने यात ट्रम्प बचावले त्यांच्या कानाला गोळी लागून गेली त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांचे एन्काऊंटर केले परंतु ट्रम्प त्यांच्यावरील गोळीबारानंतर आता भारतातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे खास करून पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत खूप काळजी घेतली जात आहे कारण मोदी आणि…
स्वराज्य फाऊंडेशनच्या आरती संग्रहाचे यशवंत जाधव यांच्याहस्ते अनावरण
मुंबई – : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी आबालवृद्ध करत आहेत. घराघरांत उत्सवाचं वातावरण तयार होत आहे. सार्वजनिक मंडळांचे गणपती मंडपात दाखल झाले असून सजावट अंतिम टप्यात पोहचली आहे. पण त्याच्याच जोडीने आरती संग्रहांची गरज देखील भासत आहे. हीच गरज ओळखून “स्वराज्य…
काँग्रेसच्या राज्यात मुख्यमंत्री पदाचा भाव ५०० कोटी नवज्योत सिद्धूच्या विधानाने खळबळ
चंदिगढ/काँग्रेसच्या नेत्या आणि पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी ५०० कोटी रुपये लागतात असं नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप आणि आम आदमी पार्टीने यामुळे काँग्रेसची कार्यपद्धतीचे काळे सत्य…
लसीकरण झाल्या शिवाय दारू मिळणार नाही -उत्पादन शुल्क विभागाच्या फत्व्याने पिनाऱ्यांचे वांदे
खांडवा/करोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली मोहीम जास्तीत जास्त यशस्वी व्हावी यासाठी सरकारी अधिकारी नवी नवी शक्कल लढवत आहेतमध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने फतवा जारी केला आहे की दारूच्या कुठल्याही दुकानावर किंवा बार मध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकांनाच दारूची विक्री करावी अन्यथा दारूच्या दुकानाचा परवाना एक महिन्यासाठी स्थगित केला जाईल.उत्पादन…
आरोप होऊनही अजित पवारांकडून पाठराखण – धनंजय मुंडेना पक्षात मानाचे स्थान
मुंबई : संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांसह सहकारी पक्षांच्या आमदारांच्या निशाण्यावर असतानाही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सोबतीने धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई करांच्या खिशाला आणखी भार- मलजल प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचा खर्च वाढणार
मुंबई -गेल्या अनेक वऱ्हांपासून रखडलेला मुंबई मलजल प्रकलपाला पुन्हा चालना मिळणार आहे मात्र या प्रकल्पाचा खर्च वाढल्याने त्याचा भुर्दंड आता मुंबईकरांना सोसावा लागणार आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचा खर्च आता आणखी वाढणार आहे. दहा वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी आता २६ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च करावा लागणार आहे. येत्या…
