[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अखेर त्याला अमेरिकेने काबूल मध्ये गाठून ड्रोन हल्ल्यात ठार केले- अलकायदा प्रमुख जवहिरीचा खात्मा


काबूल / अमेरिकेतील 9/११च्या हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला जगातील सर्वात मोठ्या दहशत वादी संघटनेचा म्होरक्या आणि लादेनचा उजवा हात अल कायदा प्रमुख अल जवाहिरी याला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केले आहे
अल कायदा ही जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आहे आणि अमेरिकेसह जगातील अनेक राष्ट्रांमध्ये त्यांनी हल्ले केलेत मात्र ९/११ चां अमेरिकेतील हल्ल्या नंतर लादेन आणि जवाहिरी हे दोघे प्रसिद्धीच्या झोतात आले पण दोघेही फरार होते . मात्र अमेरिकेकडून त्यांचा शोध सुरू होता दरम्यान काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातील इस्टाबाद येथे लादेन असल्याची माहिती मिळताच .अमेरिकेने पाकिस्तान मध्ये घुसून लादेनला ठार मारले त्यानंतर अल जवाहिरी अल कायदाचा प्रमुख बनला . त्यालाही अमेरिकेची सी आय ए ही गुप्तचर संघटना शोधत होती पण तो साप डत नव्हता अखेर तो कबूल मध्ये असल्याचे समजले त्यानंतर अमेरिकन गुप्तचरांनी त्या भागाची तीन महिने रेकी केली आणि टारगेट सेट होताच द्रोन सोडून बाल्कनीत उभ्या असलेल्या जवाहिरी वर ड्रोन आदळला आणि तो जागीच ठार झाला ही माहिती स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली अल जवाहिरी याच्या नंतर सैफ अल आदेल हा अल कायद्याचा प्रमुख बनला आहे .

error: Content is protected !!