[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पत्रकारांनाचा लसिकरण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…-नाबाद १०५….

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित कोविड प्रतिबंधक लसिकरण शिबीराला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल १०५ जणांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन शिबीराचा लाभ घेतला. या शिबीराचे उद्घाटन सर जे.जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिझवी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अख्तर रिझवी , संचालक रुबीना रिझवी आणि कामा व आल्बेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पालवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के, स्वाती घोसाळकर आणि शिबीराचे मुख्य समन्वयक देवेंद्र भोगले उपस्थित होते. सापळे आणि पालवे यांनी पत्रकार संघाला या लसी मोफत उपलब्ध करुन दिल्या होत्या. तर फूड गिफ्ट हॅम्पर रिझवी ग्रुपने प्रायोजित केले होते.

लवकरच पत्रकार संघातर्फे हृदय तपासणी आणि महिलांमधिल कर्करोगाबाबत जनजागृती कण्याबाबत हायटेक आरोग्य शिबीराचे आयोजन करणार आहोत. त्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिले. -संदीप चव्हाण कार्यवाह

error: Content is protected !!