मुंबई/ शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या 115 एस टी कामगारांना तसेच त्यांचा वकील गुन सदावर्ते यालाही मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदावर्ते याच्या चिथावणी वरून काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी 115 एस टी कामगारांना अटक करण्यात आली होती त्यानंतर सदावर्ते यालाही अटक करण्यात आली पोलिसांच्या चौकशीत पवारांच्या घरावरील हल्ला हा सुनियोजित कट होता असे उघडकिस आले आहे .दरम्यान सदावर्ते याच्या विरुद्ध राज्याच्या अन्य 5 पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत दरम्यान आज सत्र न्यायलयाने हल्लेखोर एस टी कामगारांना प्रत्येकी 10 हजाराच्या हमिपत्रावर जमीन मंजूर केला त्यामुळे त्यांची सुटका होणार आहे पण सदावर्ते याची मात्र सुटका होणार नाही .
Similar Posts
देशमुख हत्याकांडातील कथित आरोपी वाल्मिकी कराड अखेर पोलिसांना शरण
पुणे – : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष…
मुंकुद लिमिटेड अस्थापनातील दडपशाहीला उत्तर दिले जाईल – विश्वास उटगी
मुकंद ली. या कंपनीने एम आय डी सी च्या मालकीची कळवा येथे असलेली लिझ वर भुसंपदित कायद्याखाली मिळालेली जमीन – ‘करण्याचा बेकायदेशीर घाट घातलेला आहे आणि त्याला कळवा मुकद एम्प्लांईज संघटनेने विरोध करून त्याबाबत मा. उच्च न्यायालयात रीट पीटिशन क्रमांक (st. 6081of 2021) दाखल केलेला आहे. सदर बेकायदेशीर जमीनविक्री ही येथील कामगार, महाराष्ट्र सरकार…
बांगलादेशातील ढाका येथील विमानतळाला आग
ढाका/बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो क्षेत्रात आज आग लागली. अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही.आग इतक्या वेगाने पसरली की विमानतळ अधिकाऱ्यांना सर्व उड्डाणे तात्काळ थांबवावी लागली. दिल्लीहून ढाका जाणारे विमान कोलकात्याकडे वळवण्यात आले.अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या गेट क्रमांक ८ जवळील कार्गो भागात दुपारी २:३० वाजता आग लागली. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली…
भाजपच्या माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार -मलिक
मुंबई/ सध्या रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणारे नवाब मलिक यांनी आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एका माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले त्यामुळे तो मंत्री कोण आणि त्यांचा घोटाळा कोणता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान मलिक यांना आता कुणीही गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे त्यांना काहीही बोलुदेत आम्हाला काहीही…
जीआर फसवा! मराठा आरक्षणाबाबत संभ्रम कायममराठा नेत्यांचाच दावा
मुंबई/ मुंबईतील मराठा आंदोलनांना नंतर सरकारने जरांगे यांच्या ८ मागण्या मान्य केल्या होत्या .तसा जीआर काढला परंतु या जीआरचा काही उपयोग होणार नाही असे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी सांगितले. त्यातच मुख्यमंत्र्यांनी सरसकट हा शब्दच वगळल्याने संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे जरांगे यांचे उपोषण आणि मराठ्यांचे मुंबईतील आंदोलन वाया जाणार की काय…
एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट उलटून १३ प्रवाशांचा मृत्यू ! मृतांमध्ये नौदलाच्या ३ अधिकाऱ्यांचा समावेश
मुंबई – आज मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात एक मोठी दुर्घटना घडली . मुंबईवरून एलिफंटाकडे निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटाने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत बोटीतील १० आणि नौदलाच्या स्पीड बोटीतील ३ अशा १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती. मात्र,…
