मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरिवली पूर्व भागातील राजेंद्रनगर येथील राजेंद्रनगर झुणका भाकर केंद्राच्या चौकाचे ‘गणेशभक्त प्रताप दाजी रात चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने सध्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ‘हम साथ साथ है’ च्या भूमिकेत असल्याचे कळते. सप्टेंबर २०१३ मध्ये राजेंद्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेली चाळीस वर्षे नेतृत्व करणारे गणेशभक्त प्रताप दाजी रात यांचे आकस्मिक निधन झाले. ते शिवसेनेचे शाखाप्रमुख होते आणि विविध संघटनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. प्रताप रात यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आसावरीताई पाटील यांनी मुंबई महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने शिवसैनिकाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी नामकरणाचा प्रस्ताव ठेवला. महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर चौकाचे नामकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी आणि शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, विशाखा राऊत यांच्यासह बाळ राणे, शाम कदम, मनोहर देसाई, चेतन कदम, शर्मिला शिंदे, कांचन सार्दळ, अशोक परब, राजा खोपकर यांच्यासह शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भेटले. या निमित्ताने पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल का? ‘हम साथ साथ है’चा प्रयोग यापुढे सुरु राहणार का? असे प्रश्न लोक एकमेकांना विचारतांना दिसत आहेत.
Similar Posts
हिमाचलच्या मंडी मध्ये किंग विरुद्ध क्वीन कंगना राणावत च्या विरोधात विक्रमादित्य
मंडी/हिमाचल प्रदेश मधील मंडी लोकसभा मतदार संघात भाजपाने कंगना राणावत याना तिकीट दिले आहे तर काँग्रेसने माझी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य याना मैदानात उतरवले आहे विक्रमादित्य हे राज घराण्यातील असल्याने मंडी मध्ये किंग विरुद्ध kveen असा मुकाबला होणार आहे.2021 साधी झालेल्या पोटनिवडणुकी या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विजय झाल्या होत्या पण जिजामाता त्याने…
श्रीमती कलावती जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मुंबई/ समाजसेवक नाथाशेठ जाधव यांच्या धर्मपत्नी व मुंबई जनसत्ताचे संपादक किसनराव जाधव यांच्या मातोश्री कलावती जाधव यांचा 14 एप्रिल 2024 रोजी वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांनी निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला. 80 वर्षात पदार्पण करणाऱ्या कलावती यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कलावती यांचे पुत्र,मुली, जावई,सूना, नात सून, नातवंडे आदी परिवार उपस्थित होता
७० वर्षांवरील जेष्ठांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला . आयुष्मान भारत योजनेंतर्गत आता ७० वर्षांवरील जेष्ठ नाग्रीकानाही या योजनेचा अतिरिक्त लालाभ मिळणार आहेकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ६ कोटी वृद्ध लोक याचा लाभ घेत आहेत. ते म्हणाले की, घरातील एकापेक्षा जास्त वृद्ध व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास,…
६५ हजार एसटी कामगारांना मिळणार गणवेश
मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आनंदाची बातमी आहे. एसटीच्या राज्यभरातील ६५ हजार कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना नवे कोरे गणवेश पुरविण्यासाठी टेंडर काढले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दोन गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता मिळणार आहे. या नव्या निर्णयामुळे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी…
भारताच्या उदारमतवादी धोरणाचा फायदा घेऊ नका – जमत नसेल तर पाकिस्तानात जा ! मुस्लिम रेफ्यूजीला मुंबई उच्चं न्यायालयाने खडे बोल सुनावले
मुंबई : भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका, जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा असे खडे बोल हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले आहेत. पुण्यातील एका रेफ्युजीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे खडे बोल सुनावले आहेत. साल 2०१४-१५ दरम्यान सुरू असलेल्या येमेन युद्धादरम्यान तेथील अनेक नागरिक देश सोडून अन्य देशात गेले. याच दरम्यान बहिणीच्या कर्करोगावरील उपचारासाठी…
इंटरपोलच्या धर्तीवर भारत पोलचा शुभारंभ – गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार
नवी दिल्ली – देशातील सीबीआयने इंटरपोलच्या धर्तीवर सुरु केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या ‘भारतपोल’ पोर्टलमुळे राज्य पोलीस दले आणि अन्य केंद्रीय कायदा लागू करणाऱ्या एजन्सीना इंटरपोलच्याद्वारे आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीसाठी माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या सुविधा मिळणार आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) या देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा…
