कोरेगाव कोरेगावच्या नगराध्यक्षपदी कोरेगाव विकास आघाडीचे दिपाली महेश बर्गे यांची तर उपनगराध्यक्षपदी सुनील बाळासाहेब बर्गे यांची बिनविरोध निवड झाली.
सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या कोरेगाव नगर पंचायती मध्ये 17 पैकी 13 जागा जिंकत कोरेगाव विकास आघाडीने एक हाती सत्ता मिळवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उंलथवून टाकत एक हाती वर्चस्व सिद्ध केलेल्या आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव विकास आघाडीने चमत्कार घडविला. माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राष्ट्रवादीला केवळ चार जागा वरच समाधान मानावे लागले.
