मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची पूर्वापार पद्धत आहे .त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना.म.जोशी मार्गावर शाखेजवळ झालेल्या या सोहळ्यासाठी नायरचे अधिष्ठाता भारमल तसेच सायंन रुग्णालयाचे अधिष्ठाता जोशी यांच्या सह जी साऊथ विभागाचे एम.एच .ओ बांगर. आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत तसेच सत्कारमूर्ती महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या.
Similar Posts
सपने नही हकीकत बुनते है -इसलिये तो सब मोदीको चुभते है -लोकसभेसाठी भाजपची टॅग लाईन जाहीर
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. स्वतः पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेऊन आहेत. सपने नही हकीकत बुनते है इसीलिये तो सब मोदीको चुभते है ! अशी टॅग लाईन तयार करण्यात आली आहे . आणि विशेष म्हणजे २२ जानेवारीला रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे…
आरक्षण बाबत केंद्राकडून फसवणूक
मुंबई/ केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी राज्यांचे आरक्षण बाबतचे अधिकार काढून घेतले होते आणि आता १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसी ची यादी निश्चित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत पण जोवर ५० टक्क्यांची अत आहे तोवर काहीच होणार नाही.केंद्र सरकार राज्यांची फसवणूक करीत आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहेराज्यात मराठा…
“प्रशासकीय नेतृत्व देणाऱ्या संस्थेची (युपी एससी) यशस्वी शताब्दी !”
देशावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन- युपीएससी) नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली. देशाला प्रशासकीय नेतृत्व देण्याचे मोलाचे काम ही संस्था यशस्वीपणे करत आहे. शताब्दी निमित्त आयोगाच्या कामगिरीचा घेतलेला धावता आढावा. केंद्र सरकार किंवा विविध राज्यांचे प्रशासन अत्यंत कणखरपणे चालवण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. भारतातील…
पावसाळी अधिवेशन संपले पुढील अधिवेशन ७डिसेंबरला
मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष…
मावळ गोळीबारानंतर उत्तर प्रदेश बंद होता का?
मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला होता का? जी घटना झाली त्याचा निषेध व्यक्त व्हायलाच हवा, पण महाराष्ट्राला वेठीस का धरता? लॉकडाऊन उठवण्यासाठी तुम्हाला हफ्तेही द्यायचे आणि बंदही पाळायचा, ही कसली दुटप्पी भूमिका? लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त असताना आता बंदची गरज आहे की नाही हे आधी पटवून…
माजी सरकारी डॉक्टरच्या लॉकर मधे ए के ४७ आयएसआयचां हस्तक असल्याचा संशय
श्रीनगर/ जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. अनंतनागमध्ये माजी सरकारी डॉक्टर अदील अहमद रदर यांच्या लॉकरमधून एके-४७ जप्त करण्यात आली आहे. अदील २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जीएमसी अनंतनागमध्ये कार्यरत होते. ते जलगुंड अनंतनागचे रहिवासी आहेत.या प्रकरणी नौगाम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एफआयआर नंबर १६२/२०२५ च्या अंतर्गत भारतीय बंदूक अधिनियमच्या विविध कलमांसह यूएपीएच्या कलमांतर्गत…
