मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती मीना चंद्रकांत वाजपेयी यांचे माझगाव, मुंबई येथे त्यांची कन्या शोभा वाजपेयी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात कन्या शोभा, मुलगा दिपक, जावई जीन डिसिल्वा, सून अनिता, नात साशा, आणि एँजल असा परिवार आहे. मीना वाजपेयी या काही वर्षे अंबरनाथ येथे वास्तव्यास होत्या. नंतर त्यांनी कुर्ला येथे आपली कर्मभूमी बनविली. शरद पवार, विलासराव देशमुख, मुरली देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अविरतपणे कार्य करतांना नेहरुनगर, कमानी, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर परिसरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. मोहम्मद अरीफ मोहम्मद नसीम खान, कृपाशंकरसिंह, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड आदींच्या निवडणुकीत झपाटून काम केले. विशेष कार्यकारी अधिकारी, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अशा माध्यमातून त्यांनी नागरिकांची सेवा केली. गेल्या काही वर्षापासून आपली कन्या शोभा हिच्या माझगाव येथील निवासस्थानी वास्तव्यास होत्या. कुर्ला ही कर्मभूमी असल्याने त्यांच्या पार्थिवावरस्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपूत्र दिपकने अग्निसंस्कार केले. डॉ. आदित्य त्रिपाठी, माजी नगरसेवक ज्युलियस, सुहास साबट, बाबू कापडने, सुरेश सकपाळ, विनोद कोरी, लक्ष्मण बिश्त, मुनीलाल कनोजिया, पिंकू कलाम, जितेंद्र शर्मा, दान बहादूर सिंह, लाल बहादूर सिंह, मनोज थोरात, इक्बाल खान आदि मान्यता यावेळी उपस्थित होते. मीना वाजपेयी यांच्या कन्या शोभा वाजपेयी डिसिल्वा या पती जीं यांच्या सह जीवनधारा संस्थेच्या माध्यमातून नशामुक्तीची चळवळ राबवीत आहेत.
Similar Posts
माहिती संरक्षण विधेयकात सुधारणांची आवश्यकता!
मोदी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्वाच्या ठरणारे व्यक्तिगत माहिती ( डेटा -विदा) संरक्षण विधेयक पुन्हा सादर केले आहे. मात्र याबाबत अजूनही मोदी सरकार नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कसोटीवर पुरेसे संरक्षण देण्यात अपुरे पड़त असल्याची भावना सर्व सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचे नेमके महत्त्व विशद करणारा हा लेख. ऑगस्ट २०२२ मध्ये मोदी सरकारने डिजिटल पर्सनल…
काँग्रेस पक्षाने नेहरु गांधी परिवाराच्या जोखडातून बाहेर येण्याची गरज !
विदर्भातील एकेकाळचे जबरदस्त नेते, माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचे पिताश्री सतीश चतुर्वेदी यांनी काही वर्षापूर्वी आम्हा काही पत्रकारांबरोबर गप्पा मारतांना काँग्रेस पक्षाची परिस्थिती सांगितली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्ताने आम्ही नागपूर येथे गेलो असतांना शनिवार रविवारी नागपूरच्या बाहेर जाण्याचा एक प्रघात आहे. अशाच एका दौऱ्यावर सतीश चतुर्वेदी यांच्या समवेत गप्पा रंगल्या…
पेट्रोल डिझेल चां दराबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल-भवानजी
बाबूभाई,,म्हणतात की,सरकार जी एस टी मधून वेगवेगळ्या विकास कामांचा खर्च करते रेल्वे,रस्ते,पुल,संरक्षण आरोग्य शिक्षण यासारख्या जनहिताच्या योजनेवर खर्च केला जातो कोविड काळात केंद्र सरकारने कोविड रोखण्यासाठी अफाट खर्च केला हा सगळा खर्च जी एस टी सारख्या कारच्या रूपाने गोळा होणाऱ्या पैशातून केलावकातो शिवाय सरकार राज्यांना जी एस टी चां परतावा राज्यांना देते तरीही विरोधक केंद्राला…
सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?..भाजप नेते बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
३० वर्षांच्या न्यायालयीन सेवेतून सूर्यकांत बंडू जाधव निवृत्त
सातारा- औद्योगिक व कामगार न्यायालय सातारा येथे ३० वर्ष सेवा बजावल्यानंतर सूर्यकांत बंडू जाधव हे सेवेतून निवृत्त झाले आहेत. आपल्या सेवा काळात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सर्वांशी आपुलकीचे संबंध ठेऊन सेवा बजावली . अध्यात्म आणि भक्ती मार्गातील सूर्यकांत जाधव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी आपल्याभोवती मोठा जनसमुदाय गोळा केलेला आहे. निवृत्ती नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार…
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्या प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात ; विरोधी पक्षनेत्यांच्या केसाला हात तर लावून दाखवा ; डॉ. उज्ज्वला जाधव यांचा इशारा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय…
