अमरावती/ निसर्गाच्या प्रकोपामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण बनत चालले आहे त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होतोय आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या करतोय महाराष्ट्रात आतापर्यंत ३५ हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय पण आता कर्जाच्या या दुष्ट चक्राला कंटाळून शेतकऱ्यांची मुलेही आत्महत्या करीत आहेत अमरावती जिल्ह्यातील छिद् वाडा गावात अशाच एका कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलीने बापावर आपल्या संगोपणाच ओझ नको म्हणून गल्पस घेऊन आत्महत्या केली
शेजल गोपाळ जाधव(१७) असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव असून तिच्या बापाच्या शेतात गेल्या तीन वर्षात काहीच पिकलेले नव्हते त्यामुळे गोपाळ जाधव कर्ज बाजरी झाला होता शेजलची मोठी बहीण नोकरी करीत होती तर छोटा भाऊ शिक्षण घेत होता शेजाल ही शिकत होती पण शिक्षणाला पैसा नव्हता म्हणून बापाची तगमग तिला पहवली नाही आणि तिने गळफास घेतला या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळ हळ व्यक्त केली जात आहे
