मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एका लेडी डॉनच्या हस्तक्षेपावरून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे घेरले. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. माय सिस्टर लेडी डॉन नावाने टॅग करत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे हे त्यांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले.
Similar Posts
उल्हासनगर ची कायदा सुव्यवस्था बिघडली. पोलिस यंत्रणा सपशेल फेल
. एका हप्त्यात दोन हत्या .उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था एकदम ढासळली आहे . एका आठवड्यात दोन हत्या झाल्या आहेत .कँप 5 येथे तर एका गर्दुल्याने केवळ 20 रुपये दिले नाही म्हणुन हत्या केली आहे . तर एका दारुड्या भावाने घराच्या वाटणीवरुन मोठ्या भावाची हत्या केली आहे . दरम्यान एका अल्पवयीन गर्दुल्याने अल्पवयीन…
नवे तीन साहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिकेत
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेत पदभरती आणि पदोन्नती रखडल्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागेवर साहाय्यक आयुक्त व उपायुक्तांना प्रभारी म्हणून कार्यभार सोपवला गेला होता. त्यामुळे त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, आता पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवे तीन सहाय्यक आयुक्त यांच्या नेमणुका करून जनतेला दिलासा दिला आहे पालिकेत पी उत्तर विभागात कुंदन वळवी, एफ…
बी प्रभाग घनकचरा विभागात मक्तेदार कंत्राटदारांचा पुन्हा बोलबाला
मुंबई (किसनराव जाधव) घनकचरा विभागात सध्या कंत्राट मिळविण्यासाठी घमासन झाली असून मक्तेदार कंत्राटदारांनी कसे प्राप्त होईल त्यासाठी फिल्डींग लावल्याची माहीती सूत्राकडून मिळते. निविदामध्ये एका अटीची बागलबुबा करून अधिकार्यानी मक्तेदार संस्थाना पुन्हा कंत्राटे बहाल करणारण्यासाठी डाव खेळलाय गेला का? हा चर्चेचा विषय बनला आहे.बी प्रभाग घनकचरा व्यवस्थापन खात्यात स्वच्छतेसाठी साफसफाई कामाकरता सामायिक घर गल्ली स्वच्छता, रस्त्यावरील…
मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १५ – मुंबईकरांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे. मुंबईकरांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी मुंबईत गेल्या वर्षभरात एक लाख कोटींहून अधिक रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले असून मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांचा गौरव केला. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयHello, Hi ऐवजी ‘जय हिंद’ म्हणा, यातूनच राष्ट्रप्रेम दिसेल
अभिनेता विक्की कौशलच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ची जोरदार चर्चा रंगत आहे. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना ‘सर्जिकल स्ट्राइक’मधून सडेतोड उत्तर दिलं. या सिनेमातून पुन्हा एकदा तरूणांना प्रेरणा मिळाली आहे. देशभक्तीवर आधारित हा सिनेमा प्रत्येकामध्ये एक प्रकारचा ‘Josh’ निर्माण करत आहे. आजची तरूणाई देखील यामधून…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय..तर तंगड्या तोडून हातात देऊ प्रसाद लाडला सेनेचा प्रसाद
मुंबई- कधी कधी माणूस आपली पात्रता नसतानाही नको त्या बढाया मारीत असतो. असाच काहीसा प्रकार भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या बाबतीत घडलाय वेळ आली तर शिवसेना भवन तोडू अशा फुशारक्या मारणाऱ्या प्रसाद लाड याला आता शिवसैनिक प्रसाद द्यायला सज्ज झालेत. शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड ची खरडपट्टी काढताना शिवसेनेच्या कृपेने आमदार झालास आणि शिवसेना भवन तोडायला…
