[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

एन सी बी ची रेड भाजप कार्यकर्त्या मुळे वादाच्या भोवऱ्यात

मुंबई/ अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या ज्या क्रूझवार रेड टाकून शाहरुख खानच्या मुळासह ८ जणांना अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती ती रेड आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कारण या आरोपींना पकडुन नेणाऱ्या एन सी बी पथकात चक्क एक खाजगी गुप्तहेर आणि एक भाजप कार्यकर्ता होता असा गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्याने मोठी खळबळ माजली आहे .मलिक यांनी त्या दोघांचे भाजप नेत्यांच्या सोबतचे फोटोही ट्विट केले आहेत दरम्यान मलिक यांचे आरोप अत्यंत हास्यास्पद आहेत असे एन सी बी ने म्हटले आहेत तर किरण गोसावी आणि भानुशाली हे एन सी बी च्या पथकासोबत कसे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून आता या प्रकरणावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे राजकारण सुरू झाले आहे .

error: Content is protected !!