: मुंबई – पालिकेच्या तिजोरीत जमा होणारा मुंबई करांचा पैसा म्हणजे जणू काही आपल्या बाचीच पेंड आहे अशा पद्धतीने सत्ताधारी आणि पालिका प्रशासन त्या पैशाची उधळपट्टी करीत असतात त्यामुळे नागरी सुविधांच्या नावाखाली होणार्या या उधळपट्टीला आला बसने गरजेचे आहे मुंबई ही जगातील एक मोठी व्यापारी पेठ आणि देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे इथले इन्फ्रास्टक्यर कसे असला हवे हे वेगळे सांगायही गरज नाही पण मुंबईम मध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जाते आणि खड्डे पडून रस्त्यांची चाळन झाली की मग त्याच कंत्राटदारला ते खड्डे भरण्याचे काम कंत्राट दिले जाते . तेही वेगळे पैसे मोजून आताही मुंबईतील 24 विभागीय पालिका कार्यालयान मिळून 12 कोटी रुपये देण्यात आले आहेत विशेष म्हणजे जे कंत्राटदार काळ्या यादीत आहेत . अशानाच पुन्हा रस्त्याची कामे दिली जात असल्याने मुबई महापालिकेवर चारी बाजूने टीकेची झोड सुरू आहे .मुंबईकरांच्या पैशाची ही लूटमार कधी थांबणार ज्या कंत्राटदारला रस्त्याची कामे दिली जातात ती कामे सुरू असताना रस्त्याच्या कामात कशा प्रकारचे मटेरियल वापरले जात आहे याची पालिकेडून दखलच घेतली जात नाही ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यांची कंत्राटदारांशी अगोदरच सेटिंग असल्याने ते साईटवर फिरकताच नाही . वास्तविक रस्त्याची कामे केलीत त्या कंत्राटदाराटदारकडून त्याच पैशात रास्ते बुजवून घ्यायला हवेत पण तसे होत नाही रास्ते बांधण्यासाठीही पैसे द्यावे लागतात . त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठीही पैसे खर्च करावे लागतात यांनी यालाच म्हणतात लूटमारीचा धंदा जो पालिकेत वर्षानु वर्ष सुरू आहे .पालिकेकडून मिळालेल्या माहिती नुसार 9 एप्रिल ते 11 सप्टेबर 2021 या काळात 33,156 खड्डे बुजवण्यात आले मुख्याता डांबरी रस्त्यावर खड्डे पडत असल्याने मुंबईतील रस्त्यांचे कोंक्रेतीकरण केले जात आहे . मुंबईतील 2500 किमी रस्त्यांपाकी आतापर्यंत 750 किमी च्या रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे पण त्यानंतर तरी मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची समस्या संपेल अशी आशा बाळगला हरकत नाही . मात्र मुंबईतील रस्त्यांवरच्या या ख्ड्यामुळे मात्र आर्थिक दृष्ट्या चांगलीच खड्ड्यात जात असल्याची प्रतिक्रिया मुंबईकरणी व्यक्त केली आहे .
Similar Posts
महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू
मुंबई – महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला असून वार्ड पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे .मुंबईसह १८ महानगर पालिकांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत निवडणूक आयोग कधीही या निवडणुकांची घोषणा करू शकतो त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेतमुंबईत वार्ड संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नवीन वार्ड रचनेचा आराखडा तयार करून ,तो…
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ तरण तलावांमध्ये मिळणार पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्वावर ऑनलाइन पद्धतीने होणार २१ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार नाव नोंदणी ‘जलतरण’ अर्थात ‘पोहणे’ हा जसा एक क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक चांगला व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकर नागरिकांना या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात…
पश्चिम रेल्वेत नोकर भरती
पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3612 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.विनापरीक्षा होणार भरती अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती…
मान्सून महाराष्ट्रात दाखल पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबाई
मुंबई :मुंबई – महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची वाट पाहत होती तो पाऊस रविवारी पहाटे पासून कोसळू लागला. पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक भागात पाणी तुंबले भायखळा.,परेल,मिलन , अंधेरी आणि दहिसर सबवेत पाणी तुंबल्याने तिथली वाहतूक बंद करण्यात आली होतीभारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश,…
सायन मध्ये बिल्डरसाठी एकवीस झाडांची कत्तल
मुंबई/ एकीकडे आरेचे जंगल वाचवण्यासाठी शिवसेनेने सतेत असताना आक्रमक भूमिका घेतली होती पण दुसरीकडे मुंबई महापालिकेत पालिकेची सत्ता असताना पालिकेचे वृक्ष प्राधिकरण दरवर्षी हजारो झाडांच्या कतल करण्यास परवानगी देत आहेे. त्यामुळेच गेल्या ११वर्षात ४० हजार झाडांची कत्तल करण्यात आली त्यात बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी २१ हजार पाचशे झाडे तोडण्यात आलीी.सायन कोळीवाडा सरदार नगर२ त्रिलोचन इमारतीच्या…
राहूल शेवळेंच्या गौप्य स्फोटामुळे शिवसेना नेतृत्वाचे पितळ उघडं-अखेर सेनेचे खासदारही फुटले
मुंबई/ शिवसेनेने भाजप सोबत जायचे की नाही या बाबत बंडखोर आमदारांची जी भूमिका होती तीच भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची होती आणि त्यांनीही आम्हाला युती बाबत भाजप नेत्यांशी बोलून घ्या असे सांगितले होते असा धक्कादायक गौप्य स्फोट शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे .दरम्यान आज शिवसेनेचे लोकसभेतील 8 खासदार शिंदे गटात सामील झाले…
