[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महापालिका

जुहूमध्दे क्लीनप मार्शलला नागरिकांनी चोपले- मास्क वरुण राडा

मुंबई – कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मास्क ची सक्ती केली आहे मास्क न घळणार्‍याना 250 रुपये दंड आकारला जातो .त्यासाठी पालिकेने क्लिनप मार्शल ठेवले आहेत पण हे क्लीनप मार्शल कधी कधी लोकांना खूपच त्रास देतात मास्क थोडा जारी नाकाच्या खाली असला तरी फोटो काढतात आणि दंड आकारतात त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक आणि क्लीनप मार्शल यांच्यात वाद होत आहे . काल जुहू परिसरात मास्क वारून झालेल्या वादा नंतर मास्क नसलेल्या माणसाचा फोटो काढला त्याला त्याने हरकत घेताच मार्शलनी त्याला मारहाण करायला सुरवात केली . मात्र तिथे हजर असलेल्या लोकांनी हा प्रकार पाहताच ते धावले आणि त्यांनी क्लीनप मार्शलला चांगलाच चोप दिला . या मारहाणीत मार्शच्या डोक्याला इजा झाल्याने त्याचे रुग्णालयात सिटीस्कन करण्यात आले .या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते

error: Content is protected !!