मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या ठिकाणी आपले गाळे असतील तर दाखवून द्या मी स्वतः त्यांना टाळे लावते असेही त्यांनी सांगितले.सोमय्या यांनी यापूर्वी कोवि ड सेंटर घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले होते आणि आता नव्याने आरोप केले आहेत
Similar Posts
बेळगावमध्ये मराठ्यांच्या महामेळाव्याला कानडी सरकारने परवानगी नाकारली ! नेत्यांची धरपकड सुरू
बंगळुरु/कर्नाटकमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी बेळगावला जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एसटी डेपोत जोरदार निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे. तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तणावाचे वातावरण झाल्याने कर्नाटक- महाराष्ट्र…
महाविकास आघाडीचा भाजपला मोठा दणका –पिंपरी चिंचवड महापालिकेवर ए सी बी चा छापा- खळबळजनक
पुणे/ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशा बढाया मारणाऱ्या भाजपचा काल पिंपरी चिंचवड महापालिकेत पर्दाफाश झाला आहे .भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत चक्क स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि त्यांच्या स्विय सहायकला दोन लाखांची लाच घेताना अटक झाली. या घटनेमुळे श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची आणि सत्ताधारी भाजपची मोठी नाच्चकी झाली आहे.काल…
पुनर्विकासासाठी पालिकेकडे पैसा नाही-अतिक्रमित आरक्षित भूखंडावर पालिका पाणी सोडणार
मुंबई/ पालिका अधिकारी आणि भूमाफिया यांच्यातील सेटिंग मुळे मुंबईच्या अनेक आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण होऊन तेथे झोपड्या आणि व्यावसायिक गाळे बेकायदेशीरपणे उभे राहिले आहेत. आता हे अतिक्रमित भूखंड ताब्यात घ्यायचे झाल्यास त्यावरील झोपड्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे लागेल पण त्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल. शिवाय हे मोकळे करून घेण्याच्या प्रक्रियेत न्यायालयीन अडथळे सुधा येण्याची शक्यता आहे ….
गेल्या ५ वर्षात देशातील २,०४,२६८ कंपन्या बंद पडल्या केंद्र सरकारची संसदेत माहिती
नवी दिल्ली/देशात खासगी कंपन्या बंद होण्याचा मुद्दा संसदेत उठवण्यात आला. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये देशात २,०४,२६८ खाजगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. कॉर्पोटर व्यवहार मंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसंदेत यासंबंधी माहिती दिली.२०२४/२५ या आर्थिक वर्षात २०,३६५ खाजगी कंपन्या बंद झाल्या.२०२३/२४ मध्ये २१,१८१कंपन्या बंद झाल्या.२०२२/२३ मध्ये सर्वाधिक ८३,४५२ कंपन्या बंद झाल्या.२०२१/२२ मध्ये ६४,०५४कंपन्या…
मुंबई महानगरपालिका शूटिंगबॉल संघाने पटकावले अंतिम विजेते पद
ए वन संघ माणकुले ता. अलिबाग जि. रायगड आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा दि. ५ मार्च २०२३ रोजी दिवस/रात्र विद्युत झोतात कै. विश्वास शंकर पाटील क्रीडानगरी माणकुले येथे पार पडल्या. सदर स्पर्धेत राज्यातील बलाढय अशा २० संघांना निमंत्रित करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिका शूटिंगबॉल संघाने साखळी सामान्य मध्ये विजयी घोडदौड करत उपांत्य फेरीत मजल मारली…
महाराष्ट्राला धक्का! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जबरदस्ती धर्मांतरानंतर लग्न; वकीलसह ५ आरोपी
सोलापूर : सोलापूर शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ब्लॅकमेलिंगनंतर जबरदस्ती धर्मांतर करून लग्न लावल्याची भयानक घटना उघडकीस आली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात वकीलसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तिघांना अटक!आरोपी इजराईल शेखने डिसेंबर २०२४ मध्ये पीडितेचे फोटो-व्हिडिओ मिळवून ब्लॅकमेल सुरू केले. मित्र उजेब शेखच्या घरी नेून अत्याचार केला. डिसेंबर २०२५ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून काझी कार्यालयात नेले….
