: मुंबई साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांच्या संगोपणाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली असून तिच्या मुलींना सरकारी योजनेतून 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे . काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते .या घटनेकडे सरकार अत्यंत गांभिर्याने पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संगितले .तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलली असून मुंबई पोलिसांनी शहरातील टपोरी चारशी गरदूलले तसेच पोलिस रेकॉर्ड वरील दाखलेबाज गुंडा विरूढ एक मोहीम उघडली आहे . सह्याद्रि अतिथिगृहावर झालेल्या या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे पोलिस महासंचालक संजय पांडे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुखी सचिव आशीष कुमार सिंह पोलिस आयुक्त हेमंत नगरले ,सह पोलिस आयुक्त विश्ब्वस नगरे पाटील आदि हजर होते .
Similar Posts
बोमई विरुद्ध महाराष्ट्रात संताप
मुंबई/ सांगली जिल्ह्यातील. 42 गावे कर्नाटकात येणार आहेत असे विधान केल्यानंतर महाराष्ट्रात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे . दरम्यान महाराष्ट्राची एक इंचही जामीन कर्नाटकला देणार नाही उलट कर्नाटकात असलेला मराठी भाषिक प्रदेश कायदेशीर मार्गाने महाराष्ट्रात असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर फडणवीस यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असे…
संभाजी भिडे याला महिला आयोगाची नोटीस
मुंबई/ तू अगोदर कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन असे एका महिला पत्रकाराला सांगणाऱ्या संभाजी भिडे याला राज्य महिला आयोग नोटीस पाठवणार आहे.संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यापूर्वी तुम्ही मंत्रालयात कोणाला भेटायला आले होते असता प्रश्न एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे याना विचारताच ती अगोदर कुंकू लाऊन ये.प्रत्येक स्त्री भारतमाता आहे आणि भारतमाता…
बारावीचा निकाल 94.22 टक्के पुन्हा मुली आणि कोकण अव्वल
मुंबई/ बारावीचा निकाल काल जाहीर झाला.94.22 टक्के इतका बारावीचा निकाल लागला असून यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे तसेच यावेळीही कोकण विभाग अव्वल आहे तर आमची मुंबई पार तळाला गेली आहेयंदा बारावीच्या परीक्षेला जवळपास साडे चौदा लाख मुले बसली होती त्यातील 94.22 टक्के पास झाली यावेळी सर्वाधिक 97.21 टक्के इतका निकाल कोकण विभागाचा लागला तसेच यावर्षीही…
ठाणे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात
मुंबई/ घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी एक म्हण आहे आणि ती खरी आहे.कारण शिंदेंच्या बंडात सेनेचे 50 आमदार सामील झाले आणि शिवसेना फुटली सरकार कोसळले .शिवसेना फोडणारे शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता सगळेच शिंदेंच्या मागे जात असून त्यांची सुरुवात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली ठाण्यातील सर्व शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून…
चंदगड तालुका पंचक्रोशी को. ऑप.क्रेडिट सोसायटी निवडणुकीत सत्ताधार्याचा विजय
मुंबई/ कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील जनतेच्या विकासात मोठे योगदान असलेल्या चंदगड को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत 1410 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत सत्ताधारी कै.सटूपा रवळू करबंळकर पॅनल विरूद्ध श्री.रवळनाथ परिवर्तन सहकारी पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.मात्र निकाल सत्ताधारी करंबेळकर पॅनलच्या बाजूने लागला असून त्यांनी 10 पैकी…
एस टी कामगारांचा संप चिघळणार; सरकारचा प्रस्ताव अमान्य
मुंबई/ न्यायालयाच्या आदेश नुसार सरकारने जो जी आर तयार केला आहे तो एस टी कामगारांना मान्य नसल्याने एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार आहे त्यामुळे न्यायालयाच्या ऑर्डर नंतर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काल न्यायालयीन सुनावणी नंतर एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी तात्काळ समिती नेमावी आणि तिची बैठक घेऊन एस टी…
