मुंबई: न्यू सातारा समूहातर्फे भव्य हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांच्या संकीर्तन सेवांचा समावेश आहे. हा सप्ताह शुक्रवार ३ एप्रिल २०२६ पासून गुरुवार ९ एप्रिल २०२६ पर्यंत होणार आहे. गिरणगाव परिसरातील सर्व वारकरी बंधू-भगिनींनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यू सातारा जिल्हा नागरिक मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत करण्यात आले आहे.
कीर्तनकारांची तालिका:
शुक्रवार, ३ एप्रिल २०२६: शिवचरित्रकार वाणीभूषण ह.भ.प. श्री. गुरुदेव महाराज चव्हाण कोपरगावकर (कोपरगाव).
शनिवार, ४ एप्रिल २०२६: ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज देशमुख (श्री क्षेत्र पंढरपूर).
रविवार, ५ एप्रिल २०२६: ह.भ.प. श्री. ॲड. चिदंबरेश्वर किसन महाराज साखरे (साधकाश्रम आळंदी, देवी).
सोमवार, ६ एप्रिल २०२६: ह.भ.प. श्री. भागवत महाराज शिरवळकर (फडमालक गंगू काका शिरवळकर फड, पंढरपूर).
मंगळवार, ७ एप्रिल २०२६: अधिवक्ता ह.भ.प. श्री. कृष्णा महाराज चवरे (श्री गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फडाचे उत्तर अधिकारी).
बुधवार, ८ एप्रिल २०२६: ह.भ.प. श्री. गुरुवर्य चैतन्य महाराज वासकर (फडमालक वास्कर फड, पंढरपूर).
गुरुवार, ९ एप्रिल २०२६: उच्च विद्या विभूषित ह.भ.प. श्री. जयेश महाराज भाग्यवंत (काल्याची कीर्तन सेवा).
कीर्तन वेळ: सायंकाळी ७ ते ९.
स्थळ: सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगण, गणेश टॉकीजच्या पाठीमागे, लालबाग, मुंबई ४०००१२.
या भव्य कार्यक्रमाने भक्तीचा वर्षाव होईल, अशी अपेक्षा आहे.

