सावंतवाडी /नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपवर टीका केली आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चार मराठी शब्द बोलता येत नाही, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रध्दा सावंत भोसले यांना टोला लगावला. सावंतवाडी हे शहर माफियांच्या हातात जाऊ नये. भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत असे दीपक केसरकर म्हणाले. नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याचं भाजपनं ऐकल नाही असेही केरसकर म्हणाले. नारायण राणे यांच्या सोबत माझा संघर्ष झाला, मात्र तो संघर्ष विचारांचा होता. आता आम्ही एकत्र आहोत असेही केसरकर म्हणाले
नारायण राणे यांनी युती करायला सांगितली होती, मात्र षडयंत्र करून युती केली नाही असे दीपक केसरकर म्हणाले. सावंतवाडीतील मोती तलावावर केस राजघराण्याची आहे. त्या उद्या नगराध्यक्ष झाल्यावर मोती तलावावर हक्क सांगून राजघराणे तलाव हडप करेल असेही केसरकर म्हणाले. मोती तलावावरील केस मागे घेऊन भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रध्दा सावंत भोसले यांनी निवडणूक लढवावी असेही केसरकर म्हणाले.
. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मचरित्रात बापुसाहेब सावंत यांचा उल्लेख आहे. बाहेरच्या व्यक्तीने काय सांगाव, विकास आपण करणार नाव न घेता असा टोला देखील नितेश राणेंना केसरकरांनी लगावला. राजघराण्याच्या सार्वजनिक मालत्तेवर केव्हाही दावा केला नाही, मात्र आताचे राजघराणे दावा करत आहे. गेली 30 वर्ष एकही दंगल झाली नाही, हे सावंतवाडीची वैशिष्ट आहे. त्यामुळे सावंतवाडी शांत आहे असे केसरकर म्हणाले. दरम्यान, मला कट कारस्थान करून संपवता येणार नाही. कितीही पैसे वाटा असे मतही यावेळी दीपक केसरकरांनी व्यक्त केले. तसेच लाडकी बहिण योजनेबाबत देखील मंत्री दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात लाडकी बहीण योजना आणली आहे. ती कायम ठेवली असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

