मालवण/भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळी जिह्यात येतात, तेव्हा वेगळं वातावरण करतात. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी २५ लाख रुपये मिळाल्यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे. काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले ते सहज आले नव्हते, त्यांच्यावर माझा संशय होता. मालवणमध्ये ६ ते ७ घर आहेत तिथे रोज पैशांच्या बॅग येतात. भाजपचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. पैसे वाटून निवडून आल्यानंतर ते नगरसेवक काम करणार का? ते वसुलीच्या कामाला लागतील अशी टीका निलेश राणे यांनी केलीय
बाहेरुन आलेल्या लोकांनी ही संस्कृती आणली आहे, असा आरोप देखील निलेश राणे रवींद्र चव्हाण यांच्यावर केला. रवींद्र चव्हाण येतात, गडबड करतात, त्यांना जिरवा जिरवी करायची असते. रवींद्र चव्हाण यांनी विकासाचा अजेंडा कुठे दाखवला. आता २४तास यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. आम्ही पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करु असेही निलेश राणे म्हणाले. पैसे वाटून नगरसेवक झाले तर ते भ्रष्टाचार करणार. त्यातून ते घर चालवणार, कसला विकास करणार? असा सवाल देखील निलेश राणे यांनी केलाय. युती करताना आमची गरज नव्हती. मात्र, मत मागायला आमच्या नेत्यांची गरज लागते. केसरकर, नारायण राणे या ज्येष्ठ नेत्यांची यांना गरज लागते. विरोधक दिशाभूल करून लोकांना फसवतील तर शहर तिथल्या तिथे अडकून पडतील असे म्हणत निलेश राणे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप आणि शिवसेना एकच कुटुंब आहे. आम्ही भाजपला वेगळ समजत नाही. एक माणूस चुकला म्हणजे पुर्ण भाजप चुकलेली नाही. आम्ही भाजपावर आरोप करत नाही असेही निलेश राणे म्हणाले
