तिरुपती बालाजीची जमीन हॉटेलला दिल्याचा आरोपआंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अडचणीत
हैदराबाद/ तेलगू देशांचे नेते आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकार पर्यटनाच्या नावाखाली मंदिराच्या मालमत्तांचा लिलाव करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे. यामुळे सनातन धर्माचे उल्लंघन झाले. हा हिंदू धर्मावर ‘थेट हल्ला’ आहे. हा विषय केवळ जमिनीचा नाही. तर जगभरातील भगवान वेंकटेश्वर स्वामी भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि प्रतिष्ठेबद्दलचा आहे,’ असे ते म्हणाले. जगभरातील भाविकांनी या निर्णयाला विरोध करावा, असे आवाहन केले.
तिरुपतीमधील तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या मालकीची २० एकर जमीन सुमारे १,५०० कोटी रुपयांची किमतीची आहे. तिचे मूल्य ग्रामीण भागातील जमिनीइतके बदलण्यात आले. ज्यामुळे १,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. जमीन देवाणघेवाणीच्या नावाखाली तिरुपती देवस्थानाची मौल्यवान मालमत्ता हॉटेल कंपनीला देण्याच्या कटामागील सूत्रधार नायडू आहेत. हा करार मंजूर करण्यासाठी सात मे रोजी टीटीडीची बैठक झाली आणि सात ऑगस्ट रोजी सरकारी आदेश देण्यात आला,’ असाही दावा रेड्डी यांनी केला.
नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकार पर्यटनाच्या नावाखाली मंदिराच्या मालमत्तांचा लिलाव करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे. यामुळे सनातन धर्माचे उल्लंघन झाले. हा हिंदू धर्मावर ‘थेट हल्ला’ आहे. हा विषय केवळ जमिनीचा नाही. तर जगभरातील भगवान वेंकटेश्वर स्वामी भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि प्रतिष्ठेबद्दलचा आहे,’ असे ते म्हणाले. जगभरातील भाविकांनी या निर्णयाला विरोध करावा, असे आवाहन केले.