पश्चिम बंगाल मधून ममता सरकार घालवणार भाजपा येणार!”कोलकत्यातील रॅलीत पंतप्रधान मोदींचा निर्धार
कोलकाता/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लकाता येथील रॅलीला प्रचंड गर्दी झाली. गर्दी एवढी झाली होती की कार्यक्रम स्थळ ओव्हरपॅक झाले होते. लोकांनी जागा न मिळाल्याने त्यांनी दुरदर्शनच्या ओबी व्हॅनजवळ उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. सभेच्या जागी मुंगी शिरायलाही जागा नव्हती. त्यामुळे शेकडो लोक रस्त्यावर जागोजागी थांबून पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकत असताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केलात. घुसखोरीचाही उल्लेख केला आणि घुसखोरांविरोधात मोहिम सुरु करण्याचे सुतोवाच केले.
बिहारच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान आता पश्चिम बंगालची राजधानी कोलकातात पोहचले होते. येथे त्यांनी जेसोर रोड मेट्रो स्थानक ते नोआपारा-जय हिंद विमानबंदर मेट्रो सेवा, सियालदह-एस्प्लेनेड मेट्रो सेवा आणि बेलेघाटा-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधन केले. त्यावेळी राज्यातील सध्याच्या टीएमसीच्या ममता बॅनर्जी सरकारवर त्यांनी कठोर शब्दात हल्ला केला. यावेळी टीएमसीची सरकार जाणार आणि बीजेपी येणार अशी घोषणा मोदी यांनी यावेळी केली.पीएम मोदी यांनी रॅलीला संबोधित करताना स्पष्ट केले की आता घुसखोरांना देशातून बाहेर जावे लागेल. आम्ही घुसखोरांविरोधात मोहीम सुरु केली आहे. घुसखोरीबद्दल आपण लाल किल्ल्यावरील भाषणात चिंता व्यक्त केली होती. ही चिंता घुसखोरीच्या वाढत्या धोक्याबद्दल आहे. कोलकाता आणि प.बंगाल नेहमीच काळाच्या पुढचा विचार करतात. त्यामुळे मी नेहमीच राष्ट्रीय आव्हानांविषयी येथे नेहमीच बोलत असतो असेही मोदी यावेळी म्हणाले.
