योगेश कदम,कोकाटे दोघांनाही अद्दल घडवली चुकीला माफी नाही! मुख्यमंत्र्यांची तंबी
मुंबई मंत्र्यांचे नको ते कारनामे आणि त्यामुळे सरकारची होत असलेली बदनामी, यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाले असून, ते आता ऍक्शन मोडवर आले आहेत.त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारचा परवाना रद्द केला आहे.तर सभागृहात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले आहे.इतकेच नव्हे तर यापुढे चुकीला माफी नाही! असे म्हणत सर्व मंत्र्याना तंबी दिली आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, विरोधी पक्षाकडून कोकाटें यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.तसेच सोशल मीडियावरून कोकाटे ,अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली जात होती.अखेर अजित पवार यांनी कोकाटेना कडक शब्दात समज दिली तसेच त्यांना एकवेळ संधी द्यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली त्यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद बचावले मात्र त्यांचे खाते बदलण्यात आले. त्यांच्या कडचे खाते काढून घेऊन ते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले. तर कोकाटे यांना अत्यंत कमी महत्वाचे असलेले क्रीडा व युवक कल्याण हे खाते देण्यात आले आहे.
दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कांदिवली मधील सावली बार वरून विरोधकांनी अधिवेशनात हंगामा केला होता.हा बार योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती कदम यांच्या नावे असून तिथे आर्लेस्टच्या नावाखाली बार नृत्य आणि अश्लील प्रकार चालतात असा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला होता.तसेच पावसाळी अधिवेशनात या सावली बारवर विरोधकांनी जोरदार हंगामा करीत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.ज्या मंत्र्याकडे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे तोच डान्सबार चालवतो, यावरून जनतेमध्ये तीव्र असंतोष होता.सोशल मिडियामधून योगेश कदम आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली होती.अखेर आज सावली बारचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदम यांना चांगलाच दणका दिला आहे.तसेच यापुढे मंत्र्यांची कोणतीही बेताल विधाने किंवा बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही.चुकीला यापुढे माफी नाही! अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना तंबी दिली आहे*
संतोष देशमुख हत्या प्रकरणा नंतर मंत्रिपद गमावलेले, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे, हे पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी लॉबिंग करीत होते. त्यासाठी त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला आहे.त्यामुळे पुन्हा मंत्री बनण्याचे धनंजय मुंडे यांचे स्वप्न भंगले आहे.
