अठरा वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा करा : शंकरबाबा पापळकर
मुंबई, : अनाथाश्रमातून 18 वर्षांवरील मुलांना काढून टाकलं जातं. त्यानंतर त्या मुलांच्या आयुष्याची वाताहत होते. त्यामुळे देशातील 18 वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना ते त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. शंकरबाबा पापळकर यांनी आज केली. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात आज आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते…
