सातारा/कोरोनच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आलेल्या म्हस्वडच्या सिध्देश्वर यात्रेला अखेर प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे
सातारा येथील म्हासवडच्या सिद्धनाथाची यात्रा महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या यात्रेसाठी येतात पण यावेळी कोरोनमुळे प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन केले अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि प्रशासनाने सशर्त परवानगी दिली त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी यावेळी बाहेरच्या लोकांना गावात परवानगी नसेल मास्क आणि सोशल डिस्टन्स चे पालन करावे लागेल.लसीकरण बंधनकारक असेल विशेष म्हणजे रथ फिरण्यास दोन तासांसाठी परवानगीही देण्यात आलीय
