कोरोनाग्रस्तांना वाली कोण?
’भीक नको पण कुत्रा आवर’च्या धर्तीवर ’उपचार नको पण हॉस्पिटलांना आवरा’ म्हणायची वेळ आता कोरोनाग्रस्तांवर आली आहे. हो! कोरोनाग्रस्तच. दुष्काळग्रस्त, प्रकल्पग्रस्त असतात तसे हे कोरोनाग्रस्त. कोरोनाच्या नावाखाली यांची अक्षरश: पिळवणूक चाललीय. यातील काही कोरोनाचे रुग्ण असतील. काही नाहीत. संसर्ग असला तरी अनेकांना लक्षणेही नाहीत. आजाराचा त्रास नाही. पण उपचार मात्र जीवघेणे. खर्च संपूर्ण कुटुंबाला भिकेला…
