कुणी घर देता का रे ? घर ? एका तुफानाला कुणी घर देता का ? हा जगप्रसिद्ध संवाद माझ्या मनात संपूर्ण दिवस घोळत होता आणि त्यात त्या सुप्रसिद्ध लेखकाची क्षमा मागून मला बदल करण्यावाचून रहावलं नाही. ’कुणी डेथ सर्टिफिकेट देतं का माझ्या मामेभावाला कुणी डेथ सर्टिफिकेट ? म्हणजे माझ्या मामाची अंतीम यात्रा तरी निदान सुखाची होईल आणि त्याच्या आत्म्याला सद्गती लाभेल !’ 2019 या वर्षापासून आपल्या भरतवर्षाला कुणाची द्रुष्ट लागलीय कुणास ठाऊक. कोरोना या वैश्विक महामारीच्या खाईत आपला भारत आणि प्राणप्रिय महाराष्ट्र लोटला गेलाय. या दुःखद गर्तेतून या वैभवसंपन्न महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या तमाम मंत्रिमंडळ आणि प्रशासनासह अहोरात्र मेहनत घेत आहेत. एका बाजूला पत्नी रश्मी कोरोनाशी लढा देत आहेत, दुसर्या बाजूला पर्यटन, पर्यावरण मंत्री पुत्र आदित्य कोरोनाबरोबर लढून पुन्हा लोकसेवेला लागले असतांना, चहूबाजूंनी केवळ विरोधासाठी विरोध करणार्या बेजबाबदार विरोधी पक्षाच्या आरोपांच्या फैरींमध्ये धीरोदात्तपणे राज्यशकट हाकत आहेत. कोरोना चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कठोर नियम आखून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. आपत्तीच्या डोंगराखाली सामान्य माणूस सापडला आहे. या आपत्तीमधून सामान्य माणसाला बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे सरकार सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतांना आपत्ती ही काही जणांसाठी जणू काही इष्टापत्ती ठरतेय की काय ? असा प्रश्न उभा राहिला आहे. कोरोनाच्या गेल्या वर्षभरात सरकारी जमीन, सरकारचे पाणी, सरकारची वीज घेऊन सरकारलाच अंगठा दाखविण्याचे प्रकार घडले आहेत. यावर मोदी आणि ठाकरे सरकारला ’मोठा’ निर्णय घ्यावाच लागेल, असा लेख लिहिला. हा लेख चक्क माजी मंत्र्यांनी वाचून व्वा, मोठा शब्द भावला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थात, मला या प्रतिक्रियेपेक्षा मोदी आणि ठाकरे सरकार कडून कठोर निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा होती. गेल्या 27 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी स्वतः ही सूचना बोलून दाखविली होती. एवढा सारा प्रपंच करण्याचे कारण म्हणजे आज कोरोनाच्या काळात सर्वसामान्य माणूस जणू काही अंधारात चाचपडतोय. समोर भेठलेला माणूस, बरोबर फिरणारा माणूस अचानक अंतर्धान पावतो आणि आपली नजर एकदम शून्यात जाते. कोरोनाच्या काळात वैद्यकीय अधिकारी आजारी माणसाला हात लावायला धजावत नाही. इथवर ठीक आहे. पण जो माणूस हे जग सोडून, इहलोकाची यात्रा संपवून परलोकाची यात्रा आरंभतो त्या माणसाला परलोकीची यात्रा तरी सुखाने करायला मिळावी, अशी सार्थ अपेक्षा बाळगणे निश्चितच चुकीचे ठरणार नाही. पण ही परलोकीची यात्रा या माणसाला कशी सुरु करायला मिळेल ? यासाठी त्याच्या परिवाराकडे मृत्यूचा दाखला म्हणजे ’डेथ सर्टिफिकेट’ असणे अनिवार्य आहे, अत्यावश्यक आहे. पण या कोरोनाच्या काळात हे डेथ सर्टिफिकेट मिळणेही दुरापास्त झाले आहे. माझे मानलेले मामा मोतीलाल मगनलाल तांबोळी, वय वर्ष 79 हे 16 एप्रिल 2021 च्या पहाटे इहलोकाची यात्रा संपवून परलोकीची यात्रा करायला निघाले. साधारण तासाभरात त्यांनी हालचाल केली आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल जवळ रहाणार्या डॉ. प्रवीण धारावत यांच्या समवेत संपर्क साधण्यात यशस्वी झाले. मनोहर देसाई आणि दिनेश विचारे कुसुमभारतीमधील मोतीलाल मामांच्या घरी आले. त्यांनी प्रयत्न केले आणि मग डॉ. प्रवीण धारावत यांनी ’डेथ सर्टिफिकेट’ नितीनच्या हाती सुपूर्द केले. विकी राणे आणि त्यांच्या सहकार्यांना मनोहर देसाई यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे रुग्णवाहिका आली आणि मोतीलाल मामांची परलोकीची यात्रा सुरु झाली. हे सर्व तर झाले. हे एक वानगीदाखल उदाहरण आहे पण दिवसागणिक असे कितीतरी प्रसंग घडत असतील, त्याची मोजदाद कोण आणि कशी करणार ? हाच सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा मुद्दा आहे, प्रश्न आहे. ही खरोखरीच मोठी समस्या होऊन बसली आहे. सगळ्या नियम नियमावल्या झाल्या. पण माणसाला त्याची अंतिम यात्रा सुद्धा जर सहज सोप्या पद्धतीने मिळू शकत नसेल तर काय उपयोग ? इहलोक आणि परलोक यांचा दुवा म्हणजे जसलोक. पण तो तरी सर्वांच्या नशीबी नाही. कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार माणसाला होऊच नये, कोरोना व्यतिरिक्त अन्य मार्गाने माणसाला मृत्यूही येऊ नये, असे कसे बरे शक्य आहे ? आज वैद्यकीय अधिकारी सर्वसाधारण रुग्णाला हात लावायला तयार नाही, आज वैद्यकीय अधिकारी सर्वसामान्य माणसाला जर मृत्यू आला तर त्याचा मृत्यूचा दाखला (डेथ सर्टिफिकेट) मिळविण्यासाठी परिवारजनांना किती खस्ता खाव्या लागतात. मनोहर देसाई यांनी असा दाखला मिळण्यासाठी काय काय खटाटोप करावा लागतो, याचा दाखला देतांना सांगितले की, अशाच एका वैद्यकीय अधिकार्याने चक्क पंचवीस हजार रुपये मागितले तेंव्हा त्याला चौदावे रत्न दाखविताच पाचशे रुपयात असे प्रमाणपत्र मिळाले असल्याचे सांगितले. डॉ. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असतांना एक किस्सा घडला होता. एका गावात सामान्य माणसाला वीज मिळणे कठीण झाले होते. वीज मंडळ अधिकारी आणि गावकर्यांत वाद होता. त्यामुळे जाणून बुजून वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. ही बाब जिल्हाधिकार्यांपर्यंत गेली. त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना बोलावले. जिल्हाधिकारी आणि जिल्हाप्रमुख यांच्या मध्ये ठरले. त्या वीज मंडळ अधिकार्यांना धडा शिकवायचा होता. पोलीस ठाण्यात आधीच ’तयारी’ झाली होती. जिल्हाप्रमुख गेले आणि त्या अधिकार्याच्या कानाखाली काढली. त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आणि गावात वीज चमकली. पोलिस ठाण्यात तक्रार गेली पण ती तक्रार दुर्लक्षित करण्यात आली होती, गावकर्यांना सुविधा मिळण्यासाठी हा खटाटोप झाला. अर्थात, हा मार्ग सनदशीर नव्हे परंतु काहीवेळा हेही करावे लागते. महेश वामन मांजरेकर यांच्या ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात सुद्धा सर्वसामान्य माणसाला मार्गदर्शन मिळते. परंतु कोरोनाच्या काळात सर्वसामान्य माणूस काय असाच अंधारात चाचपडत बसणार ? ’कुणी डेथ सर्टिफिकेट देतो का डेथ सर्टिफिकेट ?’ असा प्रश्न कुठपर्यंत विचारत बसणार ? अशा प्रसंगात माणसाला दिलासा कोण देणार ? या कालखंडात अनेक घटना अशा घडल्या आहेत की त्या प्रत्येक घटनेची स्वतंत्र कादंबरी होऊ शकेल. मनाला वेदना देणार्या असंख्य घटना घडल्या आहेत. एक बाब समोर आणली की हजारो गोष्टी बाहेर येतात. टाळूवरचे लोणी खाणार्या अवलादी कधी नेस्तनाबूत होतील आणि सर्वसामान्य माणूस मोकळा श्वास केंव्हा घेणार हे तो परमेश्वरच जाणे. -योगेश वसंत त्रिवेदी
Similar Posts
कोरोना ची तिसरी लाट फेब्रुवारी पर्यंत ओसरणार
मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू…
पुणे पोटनिवडणुकीत अमित शहांची एंट्री
पुणे -कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा येणार आहेत १८, आणि १९ फेब्रुवारीला ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतीलभारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजपचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरणार आहेत. येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार…
शिवसेना नेते अनिल परब याना धक्का- रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीकडून अटक
दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. सदानंद कदम यांची ईडी कार्यालयात जवळपास 4 तासांपासून चौकशी सुरु होती. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडी सदानंद कदम यांची चौकशी करण्यात आली. दापोलीतल्या कुठेशी…
प्रभाग रचना तयार ठेवा – मुंबईसह 14 महापालिकांना निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसदर्भात आज महत्त्वाचे आदेश काढले आहेत. नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर,कोल्हापूर, अकोला अमरावती, नागपूर सोलापूर, नाशिक,पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली,बृहन्मुंबई, ठाणे या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडनुक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना काढले आहेत.त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचे कामकाज येत्या दि:-११-मे पर्यंत पूर्ण करावे. दि:-१२-मे…
लालू ची मालमत्ता जप्त
नवी दिल्ली- रेल्वे विभागात नोकरीच्या बदल्यात भूखंडा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सोमवारी नवीन धक्का बसला आहे सकत वसुली (ई डी) संचालनायकडून लालूप्रसाद यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व अन्य मंडळीच्या सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे . लालू प्रसाद हे 2004 ते 2009 दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना गैरव्यवहार…
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा गाडीचा रायगडात अपघात; अपघातात मेटेंचा म्रुत्यु; पोलिस करतात तपास! मेटे यांचा निधणाने राज्यात शोककला!
रायगड(धर्मानंद गायकवाड)- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा काल मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापुर तालुक्यांतील माडप परीसरात अपघात झाला, या अपघातात मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचे नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे मेटे यांना मयत घोषित करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला.शिवसंग्रामचे संस्थापक,माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने राज्यात अनेक राजकीय…
