टिपू सुलतान प्रकरणी परस्परांच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
पुणे/काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान विषयी करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर करण्यात आलेलं पुण्यातील आंदोलन आता भाजप आणि काँग्रेसलाही भोवण्याची शक्यता आहे. या आंदोलन प्रकरणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि युवा…
