यंदा गरिबांची दिवाळी गोड होणार – फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज शंभर रुपयात
मुंबई – सध्या महागाईने शिखर गाठलेले आहे. घरगुती वापराच्या गॅस पासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंतच्या दरात वाढ होत आहे . त्यामुळे सणासुदीच्या काळात गोर गरीब जनतेची मोठी आर्थिक कुचंबणा सुरु होती. मात्र राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावरच चणाडाळ,खाद्य तेल,रवा आणि साखर या फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज रेशन दुकानांवर फक्त १०० रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ दारिद्रयरेषेखालील…
