जैन संघ रथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना
समस्त जैन संघांच्या वतीने पर्युषण महापर्वानिमित्त मलबार हिल येथील श्री चंदनबाला जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या सामूहिक रथयात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मध्वजा दाखवून रवाना केले. यावेळी राज्याचे पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित गच्छाधिपती श्रीमद विजय पुण्यपालसुरीश्वरजी महाराज व इतर जैन साधूंना वंदन केले व सर्व भाविकांना…
