आमदार अपात्रतेबाबत निकाला साठी विधान सभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देण्यासाठी 10 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. आमदार अपात्रता प्रकरणातील ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांविरोधात दाखल केलेल्या प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एक महत्वाची सुनावणी पार पडली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर पर्यंत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले…
