मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्टॉलला नामवंतांची भेट
पत्रकार संघाच्या उपक्रमाचे दिग्गजांनी केले कौतुक संमेलनात ९४ क्रमांकाच्या स्टॉलची चर्चा नवी दिल्ली – येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथनगरीतील ९४ क्रमांकाच्या स्टॉलवर होणारी दर्दी साहित्यरसिकांची गर्दी गेले दोन दिवस लक्षवेधी ठरते आहे. पत्रकार संघाने महाराष्ट्राबाहेर प्रथमच सदस्य पत्रकारांच्या पुस्तकांचे प्रदर्शन या खास स्टॉलवर आयोजित केले आहे. एका प्रकारे गेल्या कित्येक वर्षातील विविध क्षेत्रांतील…
