ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर बोर्डाचा निर्णय: खोल्या नाहीत की आसन व्यवस्थाही नाही, परंतु केंद्रांना मान्यता बहाल

वादग्रस्त परीक्षा केंद्रांना पुन्हा मान्यता बहाल; काही तांड्यांवर सुद्धा परीक्षा केंद्र

 परभणी/  गेल्या काही वर्षांपासून सामूहीक कॉपीसह अन्य गैरप्रकारात संपूर्ण राज्यात अक्षरशः बदनाम ठरलेल्या परभणी जिल्ह्यातील ठराविक गावातील त्या वादग्रस्त परिक्षा केंद्रांना छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय घेवून परवानग्या बहाल केल्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या जिल्ह्यात या वादग्रस्त केंद्रांवर सामूहीक कॉपींसह गैरप्रकारांचा कळस दिसून येईल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
        गेल्या काही वर्षात या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रातील काही तथाकथित संस्थाचालकांसह दलालांच्या साखळीने इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परिक्षांमधून मोठा धूमाकूळ घातला आहे. विशेषतः केवळ अर्थपूर्ण हेतू डोळ्यासमोर ठेवून या साखळीने इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षांमधून संबंधित परिक्षार्थीस हमखास उत्तीर्ण व गुणवत्तासुध्दा प्राप्तीचे आश्‍वासने देवून पालकांकडून प्रत्येक विषयामागे हजारो रुपये उकळण्याचे प्रकार सर्रास सुरु केलेआहेत. साखळीच्या या प्रयत्नांना दुर्देवाने मोठे यश सुध्दा प्राप्त होत आले आहे. त्यामागे दलालांच्या या साखळीला जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत काही झारीतील शुक्राचार्य तसेच छत्रपती संभाजीनगरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांचे खूलेआमपणे सर्वतोपरि सहकार्य कारणीभूत ठरले आहे. त्यामुळेच या जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परिक्षा कॅश करण्याकरीता या साखळीचे मनोबल दरवर्षी वाढत राहिले आहे. यावर्षीसुध्दा साखळीने या परिक्षा कँश करण्याकरीता चंग बांधला आहे. 

त्यासाठी परिक्षांपूर्वीच या साखळीने शहराऐवजी आडवळणावरील खेड्या पाड्यातील इमारती, खोल्या, आसन व्यवस्था किंवा अन्य मूलभूत सोयी सुविधांपासून कोसोदूर असणार्‍या शाळा, महाविद्यालयांनाच परिक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळावी या दृष्टीने लक्ष केंद्रित केले.जिल्हा परिषद शिक्षण विभाग असो, छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डात थेट प्रस्ताव दाखल करीत त्यास परिक्षा केंद्र म्हणून मान्यतासुद्धा प्राप्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळाने जाहीर केलेल्या परीक्षा केंद्रांच्या यादीवर व केंद्रांवरील विद्यार्थ्यांची संख्येवर सहजपणे नजर फिरवली तर यावर्षीही परीक्षांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होणार हे स्पष्ट होत आहे.विषेशतः परिक्षांच्या काळामध्ये या केंद्रांवर शामीयाने उभारुन, जमीनीवर मॅट किंवा सतरंज्या टाकून परिक्षार्थींना परिक्षेस बसविण्याचे, पाठोपाठ अगदी मुक्तपणे कॉप्या पुरवून किंवा सामूहीक कॉप्यांना पूर्णतः मूभा देवून परिक्षार्थींना यशस्वी करण्याचे फंडे पून्हा खूलेआमपणे अवलंबविले जाणार हेही स्पष्ट होत आहे.

या जिल्ह्यात परिक्षा दरम्यान काही वादग्रस्त केंद्रांवर थेट ध्वनीक्षेपक लावून परिक्षार्थींना प्रश्‍नांची उत्तरे गार्डींग करणार्‍या शिक्षक, प्राध्यापकांमार्फत सांगण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यापेक्षा कहर काही केंद्रांवर नियुक्त केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या ताफ्याऐवजी कोचिंग क्लासेसमधून शिकविणार्‍या खाजगी व्यक्तींना तैनात करीत परिक्षार्थींना सर्वतोपरि मदतीचे अर्थपूर्ण प्रकार घडले आहेत.
परिक्षा केंद्रांवरील या अभूतपूर्व गैरप्रकारांविरोधात शिक्षण विभाग असो, महसूल विभागानेसुध्दा ‘ब्र’ काढू नये या दृष्टीनेसुध्दा दलालांच्या या साखळीने यशस्वी असे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या दोन्ही परिक्षांमधील वादग्रस्त केंद्रांवरील गैरप्रकारांना आळा बसला.
गंगाखेड, पालम व जिंतूर या तीन तालुक्यातील वाडी तांड्यावरीलसुध्दा इमारत, वर्गखोल्या, आसन व्यवस्था व अन्य मूलभूत सोयी सुविधांपासून कोसोदूर असणार्‍या शाळा व महाविद्यालयांना छत्रपती संभाजीनगरच्या मंडळाने परिक्षा केंद्र म्हणून मान्यता बहाल केली आहे. त्या त्या केंद्रांवर पाचशे सहाशेंच्या वर परिक्षार्थी बसविले आह
परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळविण्याकरीता शिक्षण विभागाने काही निष्कर्ष ठरविले आहेत. त्या निष्कर्षांची पूर्तता करणार्‍या केंद्रांनाच परिक्षा केंद्र म्हणून मान्यता द्यावी, हे अपेक्षित आहेत. परंतु, या जिल्ह्यात काही वादग्रस्त केंद्रांना मान्यता बहाल करतेवेळी इमारतीच नसणार्‍या, पूरेशा खोल्या नसणार्‍या, संरक्षण भिंत नसणार्‍या तसेच वीज, पाणी किंवा अन्य मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसणार्‍या शाळांना परिक्षाकेंद्र म्हणून मान्यता बहाल केली आहे. मंडळातून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याची अर्थपूर्ण भूमिका त्यास कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत स्थानिक शिक्षण विभागातील प्रामाणिक आधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रातील जाणकार अस्वस्थ झाले आहेत. परिक्षा दरम्यान या केंद्रांवर सर्व गोष्टींबाबत आनंदी आनंद असणार हे या साऱ्यांना कळून चुकले आहे

error: Content is protected !!