धक्कादायक! कृषीमंत्र्यांचा सभागृहातच ऑनलाईन रमीचा डाव – विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी
मुंबई/भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा होऊनही मंत्रिपदावर असलेले ,आणि कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! असे म्हणत शेतकऱ्यांच्या विरोधात वेगवेगळी विधाने करणारे, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातच मोबाईलवर रमी खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे . महाराष्ट्रात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरलेला…
