स्वातंत्र्य दिनी चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय आमचा नव्हे तर काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांचा खुलासा
मुंबई/राज्यातील विविध ठिकाणी १५ ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी घालण्यात आल्याने नवा वाद सुरू झाला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना, अशी बंदी घालणं उचित नसल्याचे म्हटलं आहे. यानंतर आता मांसविक्री बंदीच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी, हा निर्णय काँग्रेसच्याच काळातील असून तो १२ मे १९८८ मध्ये घेण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच या निर्णयानुसार महापालिकेला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, गांधी जयंती, राम नवमी, महावीर जयंती या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार आहे, असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
१५ ऑगस्टला मटण चिकन विक्रीवर बंदी घालण्याच्या काही महापालिकांच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात मोठे वादळ उठले आहे.या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत यावर आता खुलासा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की स्वातंत्र्यदिनी तसेच काही सणांच्या दिवशी मटण चिकन यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय आम्ही नाही तर १९८८ सांली तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता.त्यावर पलटवार करताना याबाबत काँग्रेसने केवळ मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती जी आर काढला नव्हता असे काँग्रेस कडून सांगितले जात आहे
