महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होईल चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान
मुंबई/ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावी असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहेविधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष आता महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकायचे आहे त्या दृष्टीने भाजपाकडून मोर्चे बांधणी केली जात आहे…
