ठाणे/संपूर्ण महाराष्ट्राला घाबरवून टाकणाऱ्या बदलापूरच्या शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता ते ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ चार चे उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला
डॉक्टर सुधाकर पाठारे हे प्रशिक्षणासाठी तेलंगणाला गेले होते तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पाठारे आणि त्यांचे नातेवाईक भगवंत खोडके दर्शनाला गेले होते तेथून परतत असताना त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात पाठारे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले पाठारे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळवणे गावचे होते भारतीय पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वी ते सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे एक धाडसी आणि प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख होती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक व या प्रकरणाचा तपास पाठारे यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू होता
