भाजपा शासित राज्यांमध्ये जर बंगालींचा छळ होत असेल तर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परतावे – दरमहा ५ हजार देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा
कोलकाता/ज्या राज्यात डबल इंजिन सरकार आहे, तिथे बंगाली भाषिकांना त्रास दिला जात आहे. परराज्यात गेलेल्या बंगाली लोकांची संख्या जवळपास २२ लाख आहे. या सर्वांनी पुन्हा आपल्या राज्यात यावे, परराज्यात ज्या बंगाली भाषिकांचा छळ होतोय, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परतावे. त्यांच्या मदतीसाठी श्रमोश्री योजना सुरू करण्यात येईल आणि त्यांना आर्थिक मदतही दिली जाईल अशी घोषणा पश्चिम बंगालच्या…
