बांगलादेशींची पाठराखण करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना महापौरांचा इशारा! फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
मुंबई/मुंबई महानगरपालिकेतून वितरित करण्यात आलेल्या २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने ही प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. पण तरीही अजूनही ती प्रमाणपत्रे अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांच्या ताब्यात कशी? असा संतप्त सवाल रितू तावडे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास थेट सभागृहात…
