देशात १९ जूनला पोट निवडणूक
नवी दिल्ली/देशातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये १९ जून रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने त्यासाठी अधिकृत घोषणा केली आहे. गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल राज्यांतील रिक्त जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या राज्यांमध्ये काही जागा आमदारांच्या मृत्यूमुळे तसेच राजीनाम्यानंतर रिकाम्या झाल्या आहेत.
