अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्याला सरकारकडून १२८ कोटी ५५ लाखांची मदत जाहीर
परभणी/मागील चार महिन्यांपासून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे नदीपात्रा लगतच्या जमिनीचे देखील प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने आज राज्य सरकारने शासन निर्णय काढून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल १२८ कोटी…
