[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाण्यात महायुतीत वर्चस्वाची लढाई सुरू! एकनाथ शिंदे व गणेश नाईक समर्थक आमने सामने


ठाणे / ठाण्यात महायुती मधील बेबनाव शिगेला पोहचला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला गणेश नाईक सुरू लावण्याच्या तयारीत आहेत.आणि त्याला आता महाराष्ट्र भाजपतील बड्या नेत्यांचा पाठिंबा असल्याने ठाण्यात महायुतीत धमासान सुरू होणार असल्याची चिन्ह आहेत.
ठाणे शहरात सध्या मोठ्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे घटक पक्ष भाजप आणि शिवसेना आगामी पालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. तशा घडामोडी देखील बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा याआधीच केली होती. पण ठाण्यात वेगळ्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. ठाणे शहर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. इथे शिवसेनेची सत्ता आहे. ठाणे महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला होता. तर भाजपला केवळ २३ जागा जिंकून आणता आलं होतं. पण यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा एकला चलोचा नारा आहे. ठाण्यात स्वतंत्र निवडणुका लढवून १३१ पैकी ७० जागांवर निवडून येण्याचा निर्धार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी
ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांनी विशेष लक्ष घातलं आहे. गणेश नाईक यांच्याकडून ठाण्यात जनता दरबार भरवला जातो. तसेच ठाणे भाजपमय व्हावं यासाठी गणेश नाईक यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतही नाराजी असल्याची चर्चा सातत्याने समोर येत असते. दरम्यान, गणेश नाईक यांच्याकडून आगामी निवडणुकांसाठी ठाण्यात रणनीती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांची आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली? या विषयी रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली.
निवडणुकीसाठी प्रलंबित असणारे काही विषय असू शकतात. आचारसंहिता लवकरच येणार आहे. या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या जिल्हाध्यक्षांसोबत आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्रभर भाजप म्हणून सर्व ठिकाणी बैठका सुरु आहेत. आजच्या बैठकीला ठाण्यापासून ते पूर्ण पालघर जिल्ह्यापर्यंतचे कार्यकर्ते आले होते. त्या सर्वांना मी मार्गदर्शन केलं”, अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली.

error: Content is protected !!