रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना; नव्याने १५ सदस्यांची नियुक्ती
मुंबई, दि. १४- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून नव्याने १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची स्थापना झालेली आहे. रंगमंचावरील प्रयोगाच्या संहिताचे पूर्वपरिक्षण करुन सार्वजनिक करमणूकीच्या जागी…
