हेडफोन व मोबाईलच्या किरकोळ वादातून मित्राने केली मित्राची हत्या.
उल्हासनगर / किरण तेलगोटे – किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संबंधित घटना ही शनिवारी घडली. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना त्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं…
