दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार अमित भाई शहा यांच्याकडे बैठक आज झाली . केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये यांचे डेलिगेशन त्यांना भेटला आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे . त्याच्या अडचणी माहिती आहे अशा सगळ्या प्रमुख लोकं सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या .अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल अशा प्रकारची बैठक आज पार पडली . विशेषता यामध्ये एक आता सगळ्यांना अडचणीत असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्स नोटिसेस एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळ जवळ गेले पंधरा वीस वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखानादारांना त्रास होतो आणि आताही तशी नोटीस आलेले आहेत म्हणून याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे .यावर अतिशय सकारात्मक भूमिका अमितशहा यांनी घेतली आहे . साखर कारखाण्यावर कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे येत्या काळामध्ये घेऊ अशाप्रकारे त्यांनी आश्वासन दिले . गेल्या जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि त्याचा मोठा त्रास कारखाना होता त्यातला एक चांगला मार्ग निघणारे आहे . महाआघाडी सरकार सहकारी साखर कारखानदराशी भेदभाव करत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला . यावेळी हर्षवर्धन पाटील आणि दाणवे उपस्थित होते .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयझोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची राज्यपालांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आपला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवे गडी नवा आखाडा
देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न…
चंद्रकांत दादांची पुडी की भाजपची मोठी राजकीय उडी दोनतीन दिवसात काय घडणार?
मुंबई/राजकारणात पुड्या सोडून खळबळ माजवूत अनेक लोक पटाईत असतात. पण कधी कधी त्यांनी दिलेले संकेत ही वादळापूर्वीची शांतता असते . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाने महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मला माझा मंत्री म्हणू नका कारण दोनतीन दिवसात बघा महाराष्ट्रात काय घडते ? आता चंद्रकांत दादांचे…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई, दि. २ :- माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय योगदान देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी पुढे पंतप्रधान म्हणून कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. साधी राहणी…
सनातन धर्म हि देशाला लागलेली कीड – जितेंद्र आव्हाड
मुंबई – धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, असं विधान आव्हाडांनी केलं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला मुंबईत बोलावून सभा घेतल्या…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईदादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलिसांची मुजोरी
मुंबई/ रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलीस यांच्या मुजोरी मुळे प्रवासी खूप, हैराण, ,झाले आहेत . कारण दादर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाच्या नजदीक,असलेल्या टॅक्सी स्टँड वर जवळची म्हणजेच परेल,नायगाव भोईवाडा येथील भाडी टॅक्सीवाले घेत नाहीत वास्तविक भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी जवळचे भाडे घेतले जात…
