निवडणूक स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई / राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्याचे निवडणूक आयोग सक्रिय झाल्याचं दिसतंय. निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही, त्यासाठी जिथं जास्त आरक्षण कोटा असेल तिथं पुन्हा सोडत करण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. सुप्रीम कोर्टातली पुढली सुनावणी २१जानेवारीला होणार आहे….
