ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांचा बाप्पांना निरोपपुण्यात ४ तर शहापूर मध्ये ५ गणेशभक्त बुडाले
मुंबई/काल चतुर्थीच्या दिवशी अकरा दिवसांच्या गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात विविध चौपाट्यांवर तसेच तसेच छोट्या गणपतींचे विविध कृत्रिम तलावांवर विसर्जन करण्यात आले. गणेश भक्तांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.मोठ्या गणपतींचा विसर्जन सोहळा पहाटेपर्यंत सुरू होता लालबागच्या राजाचे आज सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले . दरम्यान पुण्यात मनाच्या कसबा गणपतीसह सर्व गणपतींचे भक्तिभावाने…
