महाविकास आघाडीचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले
मुंबई/राज्यातील मतदार यादीत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, आयोगाने शनिवारी या सर्व आरोपांवर आपले स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावले आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालावर आधारित प्रसिद्धीपत्रकात आयोगाने सांगितले की, कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी किंवा राज्य निवडणूक आयोगाशी…
