भाईंदर/महाराष्ट्रात मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही. मुंबईच्या उपनगरात असेलल्या भाईंदर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. भाईंदर मध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे. विशिष्ट जाती धर्माची नावे घेत तसेच जात समजल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबधीत व्यक्तीने केला आहे.
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आलाय. रवींद्र खरात भाईंदर पश्चिम येथील श्री स्कायलाईन प्रकल्पात फ्लॅट खरेदीसाठी गेले होते. मात्र, “मारवाडी जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल” असे सांगत जात विचारून सरळ नकार दिल्याचा आरोप रवींद्र खरात यांनी केलाय. तसेच आहार पद्धती विचारण्यात आली, असा दावाही खरात यांनी केलाय.
रवींद्र खरात भाईंदर (पश्चिम) येथील श्री स्कायलीन प्रकल्पात फ्लॅट खरेदीसाठी गेले होते. मारवाडी जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल” असे सांगत जात विचारून सरळ नकार देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप खरात यांनी केला आहे. एस सी प्रवर्गातील असल्याचे कळताच तसेच आहार पद्धती विचारूनही फ्लॅट नाकारल्याचा गंभीर भेदभाव केल्याचा खरात यांचा आरोप आहे. हा प्रकार संविधानातील कलम १४/१५, बी एम एस वी 2023आणि एस सी/एस टी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे सरळ उल्लंघन आहे. या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, महारेरा आणि पोलीस आयुक्तालय अशा अनेक अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करणार. “घटनात्मक अधिकारांसाठी माझी लढा सुरूच राहील,” अशी ठाम भूमिक रविंद्र बाबासाहेब खरात यांनी मांडली
